प्राथमिक विभाग

प्राथमिक विभाग ग. रा. पालकर प्राथमिक शाळा

वैशाली पाथ्रुडकर

प्राथमिक विभाग

‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे’ शिक्षण ही बालविकासाची चळवळच आहे. विद्यार्थ्यांना सामर्थ्यवान म्हणजेच सबळ बनवणे महत्त्वाचा उद्देश आहे . सबळ होणे म्हणजे शारीरिक दृष्ट्या सबळ होणे , बौद्धिक दृष्ट्या सबळ होणे , संघटितरित्या सबळ होणे . मुलांची सामाजिक , भावनिक बुद्धिमत्ता जोपासणे महत्त्वाचे आहे.

प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे वय खूप कोवळं व संस्कारक्षम असतं . एकदा ही मुलं मानसिक , भावनिक दृष्ट्या सक्षम झाली की हमखास यशस्वी होतात . या ठिकाणीच प्राथमिक शिक्षकाचा खरा कस लागतो . मुलांना आपलंसं करून त्यांच्यात आत्मविश्वास भरला की मूल त्याच्या गतीने उत्तम शिकते . मुलांचे कौतुक करून प्रोत्साहन देऊन त्यांना घडवले जातं . प्रेम , माया, आपुलकी जिव्हाळा यामुळे मुलं घडतात . प्राथमिक शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पायाभरणी करून पार्श्वभूमी तयार करतो . अशी पायाभरणी मातृभाषेतून सर्वात उत्तम होऊ शकते . मुलं पोपटपंची न करता कौशल्य आत्मसात करू शकतात . येथे औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते . स्वच्छता , स्वयंशिस्त व स्वाध्याय या मूल्यांवर आधारित शाळेची गुणवत्तेकडे वाटचाल सुरू होते.

आमचे उपक्रम

कथाकथन

मुलांचे वय खूप संस्कारक्षम असते त्यामुळे बोधकथा निकिता सांगून त्यांच्या मनातील विचारांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कथेसारखा मार्ग नाही गोष्टींमुळे मुलांच्या विचाराला मनाला चालना मिळते चांगल्या वाईट अशी जाण निर्माण होते कसं वागाव कसं वागू नये याविषयी नेमकेपणा मनात निर्माण होतो.

बालसभा

लहान मुलांवर चांगले संस्कार होणे हा मुलांच्या शिक्षण प्रक्रियेतील खूप महत्त्वाचा भाग आहे त्यांना प्रेमाने आणि काळजीने हाताळले की मोकळी होतात त्यांची भीती नाहीशी होते.मोकळेपणाने ती व्यक्त होतात देशाची शक्ती आणि समाज उभारण्याचा पाया या मुलांमध्ये आहे लहान वयात चांगले मार्गदर्शन मिळाले तरच ते भविष्यात सुजाण नागरिक होऊ शकतील या उद्देशातून दरवर्षी बालसभेच्या निमित्ताने विविध योजना आखणे ,विविध विषय घेऊन त्यावर कार्यक्रम आयोजित करणे उपक्रम राबवला जातो यामधून मुलांमध्ये सामंजस्याची त्य भावना वाढते बंधुभाव वाढीस लागतो.

शेकोटी

पूर्व प्राथमिक शिक्षण हा लहान मुलांच्या जडणघडणीत सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो त्याची जाण ठेवूनच या स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात त्यामधील शेकोटी हा एक आहे मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करण्यापेक्षा मुलांना मानसिक सामाजिक दृष्ट्या समृद्ध करणारे उपक्रम गरजेचे असतात या उपक्रमातून संगीत नृत्य खेळ चित्रकला पाककला अशा विविध कलांची जपणूक दैनंदिन जीवनातील कौशल्य स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांची आवड निवड जपली जाते येथे प्रत्येक विचार आणि कृती मुलांच्या मनावर कायमची नोंद करते.

प्रश्नमंजुषा

कला संगीत खेळ यामुळे मुलांमधील सर्जनशीलता वाढीस लागते त्यामुळे नवनवीन कौशल्यांचा विकास होतो त्याचबरोबर ज्ञान वाढीसाठी ही प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबवला जातो . विविध उपक्रमात मुले सहभागी होतात यामुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळते मुले समाजात वावरायला शिकतात एकमेकांशी नेटकेपणाने संवाद साधायला शिकतात यामुळे त्यांचे मन ,विचार आणि बुद्धी समृद्ध व्हायला मदत होते.

कथामाला

या वयात मुलांची आवड कशात आहे हे शोधणे कठीण असते पण विविध उपक्रमातून त्यांच्या सहभागातून ते शोधायला मदत होते त्यांची परिश्रम घेण्याची तयारी ,इच्छाशक्ती यावरून ते लक्षात येण्यास मदत होते कथा मला ही याच उद्देशातून राबवली जाते मुलांना अभिनय, तालीम, संवाद ,आवाजाची फेक, मुकाभिनय, एकपात्री अभिनय, आवाजातील चढउतार या गोष्टी शिकायला मिळतात शिवाय त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव मिळतो.

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच सर्व काही आहे मात्र येणाऱ्या पिढीला त्याची माहिती देणे हे आपलं कर्तव्य आहे मराठा साम्राज्य निर्माण करणारा असा नेता कसा घडला हे मुलांना गोष्टीतून प्रसंगातून सांगितल्यास त्यांच्यामध्ये अधिक उत्सुकता निर्माण होते त्यांचा गनिमी कावा त्यांची युद्धनीती या गोष्टी मनोरंजक स्वरूपात त्यांना आयुष्यात पुढे काय करता येऊ शकते यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात .आपल्या पुढच्या पिढीला योग्य माहिती देण्याचे काम शिवजयंतीच्या निमित्ताने केले जाते दरवर्षी इयत्ता चौथीचे मुले विविध प्रसंग, नाटुकली, पोवाडा ,भाषणे यातून उत्तम सादरीकरण करतात.