आमचा दृष्टीकोन
आमचा दृष्टीकोन
आमचा दृष्टीकोन
३ वर्षाच्या बालकांकरिता चालत जाण्याच्या अंतरावर बालवाडी असावी,या उद्देशाने 'पुनर्वसु बालक मंदिर' ची स्थापना झाली. संस्थापिका रुक्मिणीबाई भागवत आणि अमलाताई भागवत यांनी स्वतःच्या घरातच २ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या बालवाडीला पुढील दहा वर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला.
‘अभिजात एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून प्राथमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली. १० वर्षात प्राथमिक शाळेचे बस्तान बसले आणि १९९९ मध्ये अभिजात प्राथमिक शाळेला सरकार मान्यता मिळाली.
वाढत्या विद्यार्थी पटसंख्येमुळे २००४ साली संस्थेच्या नवीन प्रशस्त इमारतीत शाळेचे स्थलांतर झाले. नवीन इमारतीमध्ये उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागही क्रमशः सुरू करण्यात आले.
अभिजात माध्यमिक शाळेला सरकारी मान्यता मिळाली. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे इयत्ता दहावीचा निकाल दर वर्षी १००% लागतो आहे.
शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि शिक्षणाच्या मदतीने भावी पिढी घडवणे.
मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी. विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास सक्षम करण्यासाठी. पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण करणे.
स्वयं-शिस्त, गुणवत्ता, समर्पण, स्वयं-प्रेरणा, सामर्थ्य, समानता, सहानुभूती, सहकार्य
संस्थेला आगामी प्रकल्पांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी
[email protected]
९८२२७६९५३५ / ९९२१७१०५८८
९८२२७६९५३५
३४/९/१ + १०/१, प्रतिज्ञा मंगल कार्यालय जवळ, कर्वेनगर, पुणे ४११०५२
‘अभिजात एज्युकेशन सोसायटी’ ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली सार्वजनिक सेवाभावी संस्था आहे.